देवेश गोंडाणे

नागपूर : राज्य शासनाच्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाड्यासाठी आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी अनेकदा कर्ज काढावे लागत होते. या निर्णयामुळे परदेशी शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना पूर्वी स्वखर्चाने विमानाचे तिकीट काढून त्या देशात जावे लागत होते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची पैसे जमा करताना दमछाक व्हायची. प्रत्यक्ष विद्यापीठात हजर झाल्यानंतर आणि तिकीट जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाड्याचे पैसे परत मिळत होते. आता या नियमात बदल करण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ६ लाखांपेक्षा अधिक आहे त्या विद्यार्थ्यांना मिळणारा विमान प्रवास खर्चाचा लाभ जुन्या नियमानुसारच मिळणार आहे, असेही या निर्णयात म्हटले आहे.