लोकसत्ता टीम

चंद्रपूर: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनगड हे सध्या लंडन दौऱ्यावर होते. दरम्यान, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला. या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले ॲड.दीपक यादवराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती धनगड व ॲड. दीपक चटप यांच्यात थेट संवाद झाला. या संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे या संवादात्मक भेटीचे फोटो उपराष्ट्रपतींच्या अधिकृत फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले असून वायरल झाले आहेत.

Blinken calls for handling differences responsibly in talks with Xi jinping
मतभेद जबाबदारीने हाताळावेत! जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेत ब्लिंकन यांचे आवाहन; चीनचा सहमतीवर भर
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, “जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात युवकांची संख्या विपूल आहे. युवाशक्ती ही खरी राष्ट्रशक्ती असते. विदेशातील भारतीय हे इथले देशाचे अम्बेसिडर आहेत. तुमच्या शिक्षणाचा उपयोग देशकल्याणासाठी करावा. जात, धर्म, पक्ष आदी भेदाभेद बाजूला सारुन आपण भारतीय आहोत ही ओळख स्मरणात असू द्या.” दरम्यान भाषणानंतर उपस्थितांशी थेट संवाद साधताना ॲड.दीपक चटप यांचीही उपराष्ट्रपतींनी विचारपूस केली.

हेहा वाचा… ‘बाप तो बाप होता है’ गाण्यावर खासदार जाधव यांनी धरला ठेका, दंडही थोपटले…

‘मी चंद्रपूर जिल्ह्यातील चेवेनिंग स्कॉलर तरुण वकील आहे. शेतकरी, आदिवासी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत रचनात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. वकीली व संसदीय धोरणनिर्मिती हे माझे मुख्य आवडीचे विषय. या दोन्ही स्तरावर तुम्ही केलेले काम दिशादर्शक वाटते’ असे हितगुज दीपकने केले. यावर स्मितहास्य करत उपराष्ट्रपती म्हणाले, ‘आपण करत असलेले काम कौतुकास्पद आहे. धोरणनिर्मिती आणि विधीक्षेत्र यांच्यात अनेक समान दुवे आहेत. त्यामुळे या दोन्ही स्तरावर योगदान देता येत आहे. तुमच्या सारख्या युवकांकडून अनेक आशा आहेत. उत्तमोत्तम काम करत राहा’ अशा सदिच्छा उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा…VIDEO: “‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे”, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

यावेळी भारताचे उच्चायुक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. भारताच्या उपराष्ट्रपतींशी लंडनला संवाद साधण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला असून देशाच्या धोरणनिर्मितीतील प्रमुखांपैकी एक व्यक्ती, राज्यसभेचे सभापती आणि ज्येष्ठ वकील असलेल्या उपराष्ट्रपतींना जवळून अनुभवता येणे प्रेरणादायी असल्याचे असे मत ॲड.दीपक चटप यांनी व्यक्त केले.