भंडारा: खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली आठ वर्षीय चिमुकली २४ तास लोटूनही परत आली नसल्याची खळबळजनक घटना पापडाखुर्द येथे आज उघडकीस आली. हिंस्त्र पशूचा हल्ला, अपघात किंवा घातपात, अशा विविध चर्चांना उधाण आले असून आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी तसेच इतर पोलीस अधिकारी या गावात दाखल झाले आणि ताबडतोब शोध मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : शिंदे सरकारचा भाजपाच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा, राऊतांचा आरोप; राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सानगडीजवळील पापडाखुर्द गावातील साडेआठ वर्षीय चिमुकली काल सायंकाळपासून बेपत्ता आहे. जि.प. प्राथमिक शाळा पापडाखुर्द येथे ती इयत्ता तिसरीत शिकत होती. शाळेतून घरी आल्यावर ती खेळण्याकरिता बाहेर गेली. मात्र, काळोख पडून गेल्यावरही लेक घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी रात्रभर शोधाशोध केली. गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस विभागाला याबाबत माहिती दिली. अद्याप या मुलीचा कुठेही शोध लागला नसून कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती आलेले नसल्याचे पोलीस अधीक्षक मतानी यांनी सांगितले.