अमरावती : जिल्‍ह्यातील बारा कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांच्‍या संचालकपदांच्‍या निवडणुकीनंतर आता सभापती आणि उपसभापतीपदाच्‍या निवडीचे वेध सहकार क्षेत्राला लागले असून १७ ते २२ मे दरम्यान बाजार समित्यांमध्ये‎ दोन्ही पदाकरीता निवडणूक होणार‎ असून अमरावती बाजार समितीला १९ मे‎ रोजी नवीन सभापती मिळणार आहे.‎ या पदांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती जिल्‍ह्यातील बहुतांश बाजार समित्‍यांवर महाविकास आघाडीने वर्चस्‍व प्रस्‍थापित केले आहे. भाजपा-शिंदे गटाला या निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. अमरावती बाजार समितीत १८ पैकी १८ जागा यशोमती ठाकूर यांच्‍या नेतृत्‍वातील सहकार पॅनलने जिंकल्‍या. तिवसामध्‍येही निर्भेळ बहुमत त्‍यांच्‍या गटाकडे आहे. या ठिकाणी सभापतीपदी त्‍यांच्‍या गटाच्‍या संचालकाची अविरोध निवड होण्‍याची शक्‍यत आहे. अचलपूरमध्‍ये कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष बबलू देशमुख यांच्‍या गटाचा वरचष्‍मा आहे. चांदूर बाजारमध्‍ये आमदार बच्‍चू कडू, दर्यापूरमध्‍ये आमदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे, धामणगाव रेल्‍वेत माजी आमदार वीरेंद्र जगताप, मोर्शीत माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, वरूडमध्‍ये भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, कॉंग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्‍या गटाकडे सभापती आणि उपसभापती निवडीचे स्‍वातंत्र्य राहणार आहे. संचालकांनी सभापती आणि उपसभापदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे कुणाच्या गळ्यात सभापतींची‎ माळ पडते याकडे आता सर्वांचे लक्ष‎ लागले आहे.‎

हेही वाचा – खगोलप्रेमींसाठी पर्वणी! नभांगणात आजपासून महाकाय आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे दर्शन

जिल्ह्यात अमरावतीसह अंजनगाव‎ सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार, धारणी,‎ मोर्शी, वरूड, नांदगाव खंडेश्वर,‎ तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या‎ १२ बाजार समित्यांमध्ये २८ ते ३०‎ एप्रिलदरम्यान मतदान व मतमोजणी पार‎ पडली. त्यामुळे आता सभापती आणि‎ उपसभापती पदाच्या निवडीकडे सर्वांचे‎ लक्ष लागले होते. याचीही प्रतीक्षा आता‎ संपली आहे. उपनिबंधक कार्यालयाने या‎ पदांसाठी अधिसूचना जाहीर करताच १२‎ ही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी‎ निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.‎

हेही वाचा – पोलिसांकडून तक्रारकर्त्यास घरपोच मिळणार कार्यवाहीची माहिती; राज्यातील पहिलाच पथदर्शी ‘सेवा’ प्रकल्प वर्धेत

अंजनगाव सुर्जी व नांदगाव खंडेश्वर‎ बाजार समितीमध्ये १७ मे रोजी‎ निवडणूक होणार आहे. एका दिवशी‎ दोन किंवा चार बाजार समित्यांमध्ये‎ सभापती, उपसभापती पदांसाठी‎ निवडणूक होऊ घातली आहे. २२ मे‎ पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे.‎ जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये‎ एका पॅनलला स्पष्ट बहुमत असल्याने‎ तेथील निवडणूक बिनविरोध होण्याची‎ शक्यता आहे. परंतु जेथे बहुमत नाही‎ तेथे मात्र, निवडणूक होणार आहे.‎

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the election of market committees preparations are now underway for the chairmanship in amravati mma 73 ssb
First published on: 11-05-2023 at 12:16 IST