scorecardresearch

Premium

नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेनंतर गोमूत्र शिंपडून भाजपाने केले मैदान शुद्ध!

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाल्यानंतर मैदान बचाव कृती समितीच्या नागरिकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाची साफसफाई केली व मैदानात गोमूत्र शिंपडून मविआच्या नेत्यांचा निषेध केला.

Mahavikas Aghadi meeting Nagpur
महाविकास आघाडीच्या सभेनंतर गोमूत्र शिंपडून भाजपाने केले मैदान शुद्ध! (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

नागपूर : पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाल्यानंतर मैदान बचाव कृती समितीच्या नागरिकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाची साफसफाई केली व मैदानात गोमूत्र शिंपडून मविआच्या नेत्यांचा निषेध केला.

हेही वाचा – शेतीचे वाद! तीन खुनांनी यवतमाळ हादरले

Ramlila mumbai
रामलीला आयोजित करणाऱ्या संस्थांना परवानगीसाठी एक खिडकी, मैदानाचे भाडे निम्म्यावर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश
atul save visit rss office
ओबीसी खात्याच्या मंत्र्यांची अचानक संघ कार्यालयाला भेट, आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना…
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…
ncp mla rohit pawar, ncp mla rohit pawar in kalyan, mla rohit pawar rally
कल्याणमध्ये आमदार रोहित पवार यांची जाहीर सभा
व्हिडीओ – लोकसत्ता टीम

सद्भभावना नगर दर्शन कॉलनी मैदान हे खेळाचे मैदान असून या मैदानात राजकीय सभा घेऊ नये म्हणून मैदान बचाव समितीने गेल्या सहा दिवसांपासून मैदानं सभेला देऊ नये यासाठी विरोध करत आंदोलन केले. मैदानाचा वाद न्यायलयात गेला. पण न्यायालयाने सभेला परवानगी दिली. रविवारी सभा झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी परिसरातील नागरिक व भाजपाचे माजी नगरसेवक हरीश डिकोडवार आणि अन्य माजी नगरसेवकांनी मैदानात गोमूत्र शिंपडले व साफसफाई करत आघाडी सरकारचा निषेध केला. दरम्यान, सभेच्या दिवशी महाआरती करणार होते. मात्र, ही महाआरतीसुद्धा रद्द करण्यात आली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After the mahavikas aghadi meeting in nagpur bjp cleaned the ground by sprinkling gomutra vmb 67 ssb

First published on: 17-04-2023 at 13:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×