नागपूर : पूर येऊन एक आठवडा उलटल्यावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सोमवारी २ ऑक्टोबरला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत.

२२ सप्टेबरच्या रात्री अतिवृष्टी झाल्याने शनिवारी पहाटे नागपूर शहरातील नाल्यालगतच्या काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली होती. सध्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरूआहे. शुक्रवारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर शहरातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पुन्हा अशा घटना टाळण्यासाठी सरकार काळजी घेईल, असे आश्वासन दिले. आता ग्रामीण भागातील पीक हानीचे सर्वेक्षण करण्यासाठी सोमवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते उमरेड, मैदा, नागपूर ग्रामीण आणि कुही तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

live worms found in chocolate distributed to students in rajura taluka
चॉकलेटमध्ये जिवंत अळ्या, सोंडे; ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती’अंतर्गत विद्यार्थांना वाटप
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
PM Narendra Modi, Palghar, Traffic jam,
कोल्हापूर : पंतप्रधानांचा दौरा पालघरला; वाहतूक कोंडी पश्चिम महाराष्ट्रात
upper tehsil office, Mohol taluka,
तहसील कार्यालयाच्या वादात शिंदे-अजितदादा गटात जुंपली, भाजपचे ‘नरो वा कुंजरो’
Ajit Pawar reacts on When will money of Ladki Bahin Yojana come to account of women in Pune district
Ladki Bahin Yojana : पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? अजित पवार यांनी थेटच सांगितले
lower court sentences man for locked leopard in room district court acquitted
बिबट्याला घरात कोंडून ठेवले, कनिष्ठ न्यायालयाने सुनावली शिक्षा तर जिल्हा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
Dhule Fake foreign liquor marathi news
धुळे जिल्ह्यात बनावट विदेशी मद्याचा साठा ताब्यात
PM Awas Yojana, Palghar, beneficiaries,
पालघर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना संथ, ६७ हजार लाभार्थी वंचित

हेही वाचा – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात आजपासून पर्यटनाला सुरुवात

हेही वाचा – उद्या हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना, काय आहे इतिहास?

सकाळी १० ते सांयकाळी ५ अशी त्यांच्या दौऱ्याची वेळ आहे. मंत्री झाल्यावर प्रथमच मुंडे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता.