भुसावळ विभागातील भुसावळ-भादली दरम्यान चौथा रेल्वेमार्ग टाकण्याचे काम करण्यासाठी नागपूरमार्गे धावणाऱ्या आणि नागपूरला येणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.रेल्वेमार्गाच्या कामासाठी भुसावळ विभागात बिगर इंटरलॉकिंगचे काम ३० आणि ३१ मार्चला करण्यात येणार आहे. त्यासाठी अहमदाबाद- नागपूर एक्सप्रेस, पुणे-नागपूर एक्सप्रेस (३० मार्च) रद्द करण्यात आली आहे. तर नागपूर-पुणे एक्सप्रेस, भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस वर्धा- भुसावळ एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस (३१ मार्च) रद्द करण्यात आली आहे. तर अहमदाबाद-नागपूर (३० मार्च) रद्द करण्यात आली.
हेही वाचा >>>यवतमाळच्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यालाही अडीच कोटी मागितले? दोन्ही लाचखोरांच्या संभाषणाचा तपशील समोर
याशिवाय अहमदाबाद-पुरी एक्सप्रेस (३० मार्च) बाजवा, छायापुरी, रतलाम, भोपाल, इटारसी, नागपूर मार्गे वळवण्यात आली आहे. अहमदाबाद-एमजीआर चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस (३० मार्च) बाजवा, छायापुरी, रतलाम, भोपाल, खंडवा, भुसावल कॉर्डलाइन, अकोला मार्गे वळवण्यात आली आहे. एमजीआर चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस (३० मार्च)भुसावल कॉर्डलाइन, खंडवा, इटारसी, भोपाल, रतलाम, छायापुरी, बाजवा मार्गे वळवण्यात आली आहे.