अकोला : वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील लोणी बु. गावात मनोरुग्ण मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. वाशीम जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या लोणी बु. गाव हत्येच्या घटनेने हादरले आहे. निवृत्ती नरवाडे (६७) व त्यांचा मनोरुग्ण मुलगा गणेश नरवाडे (२५) घरात होते. यावेळी अचानक गणेशने जन्मदाते वडील निवृत्ती नरवाडे यांच्या डोक्यावर वार केले. यात वयोवृद्ध निवृत्ती नरवाडे हे घटनास्थळीच दगावले.

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही मनोरुग्ण गणेश हा मृतदेहाजवळच बसून होता. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी रिसोड पोलिसांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. रिसोड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेची गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाची माहिती जाणून घेतली.

हेही वाचा – अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ

गेल्या काही महिन्यातील तिसरी घटना

वाशीम जिल्ह्यातील लोणी बु. येथे गेल्या तीन महिन्यांपासून हत्येचे सत्र सुरू आहे. तीन महिन्यात गावात हत्येची ही तिसरी घटना घडली. पोटच्या मनोरुग्ण मुलाने वडिलांचा जीव घेतला. त्यामुळे गाव हादरले आहे.

अकोल्यात ट्रक चालकांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

शहरातील औद्योगिक वसाहतीमधील ट्रान्सपोर्ट नगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास दोन ट्रक चालकांमध्ये मोठा वाद होऊन हाणामारी झाली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दोन आरोपीला ताब्यात घेतले.

हेही वाचा – भंडारा : ‘नील’ला नेणारा तो ‘हरा मामा’ कोण ? चार दिवसांनंतर रहस्य…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक चालक विलास इंगळे, त्यांचा मुलगा व दुसऱ्या ट्रकचा चालक गजानन गिऱ्हे व शुभम गिऱ्हे यांच्यात (सर्व. रा.लोणी लोहाल, ता.मेहकर, जि.बुलडाणा) वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये विलास इंगळे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर गजानन गिऱ्हे व शुभम गिऱ्हे हे ट्रकसह फरार झाले होते. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींना मूर्तिजापूर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस पुढीत तपास करीत आहेत.