नागपूर : मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक जतन, संवर्धन, प्रोत्साहनासाठी राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने अंदाजपत्रकात किमान ३०० कोटींची तरतुदीची मागणी करावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व मराठीच्या व्यापक हितासाठीचे संयोजक डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा – नागपूर : हवालाचे १.९७ कोटी रुपये कारची काच फोडून चोरून नेले
हेही वाचा – नागपूर : घर देता घर! मिहान प्रकल्पग्रस्त, शेतकरी अद्यापही वाऱ्यावर
यासंदर्भात जोशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवले आहे. २०१८ मध्ये मराठी भाषा विभागाला केलेल्या मागण्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य संस्कृतीविषयक जतन संवर्धन व प्रोत्साहनासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, ही रक्कम आता पाच वर्षांनंतर दुप्पटीहून अधिक म्हणजे, किमान ३०० कोटी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यात विश्व मराठी संमेलनासारखे सरकारचे नसलेले काम समाविष्ट असू नये, त्याचप्रमाणे इमारत बांधकाम व निगा राखणे अशाचाही त्यात समावेश असू नये. त्यासाठी वेगळी मागणी केली जावी, ही तरतूद केवळ उत्सवी आणि व्यासपीठीय कार्यक्रम यासाठी खर्च केली जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जुन्या कागदपत्रांचे ‘डिजिटायझेशन’, मोडी लिपी अभ्यासणे, अशा बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.