नागपूर : मुंबईत पावसाचे पाणी साचले तर मुंबईची तुंबई झाली म्हणून भाजपाने बदनामी केली. परंतु नागपुराच्या विकासाचा सोंग करून येथे सिमेंटचे जंगल केले. येथे केंद्र व राज्यातील मोठे नेतृत्व असूनही केवळ १०० ते १२५ मिलीमीटर पावसात नागपूर पुरात बुडते हे राजकीय अपयश आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

नागपुरातील अंबाझरीसह पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यावर दानवे यांनी रविभवन येथे पत्रपरिषद घेतली. त्यात ते बोलत होते. दानवे म्हणाले, आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याचे पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केले. या घटनेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे नेतृत्व असलेले देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा ‘गॅझेटिअर’मधून महत्त्वाच्या नोंदी वगळल्या

नागपुरात महापालिका व नागपूर सुधार प्रन्यासमध्ये समन्वय नसून या पूर स्थितीला तेही जबाबदार आहेत. नागपुरात प्रशासन ही घटना घडण्याची वाट बघत होते का अशी स्थिती आहे. महापालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली. मात्र या भिंतीचे काम हे चार टप्प्यात होणार होते, पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप दानवे यांनी केला.

सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याचे काम नव्याने करावे लागेल अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीच्या चारही टप्प्यांच्या कामाचा नव्याने विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) बनवून काम लवकरात लवकर हाती घ्यावे, या कामात आमचे सहकार्य राहील अशा सूचना जिल्हाधिकारींना केली. प्रशासन यंत्रणेवर नसलेले नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना पुराला सामोरे जावे लागत असेल तर हे दुर्दैव असल्याची टीका दानवे यांनी केली.

हेही वाचा – “सत्तेसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी राज्यात पेपरफुटी”, विजय वडेट्टीवार यांचा आरोप; म्हणाले…

यावेळी संपर्क प्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी खासदार प्रकाश जाधव, सुरेखा खोब्रागडे जिल्हा संघटिका, शिल्पा बोडखे पूर्व विदर्भ महिला संघटिका, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader