बुलढाणा: धक्कातंत्राचे राजकारण करीत प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून जुनेजानते नेते वसंत मगर यांना उमेदवारी दिली आहे. आज बुधवारी ही घोषणा करण्यात आली असून याद्वारे मागील लढतीचा ‘सोशल फॉर्म्युला’ वापरण्याचे वंचितचे मनसुबे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वंचितने काल रात्री पार पडलेल्या राज्य समितीच्या बैठकीत निर्णय घेत आज त्याची घोषणाही केली. पक्षाने केवळ विरोधकांनाच नव्हे तर स्वपक्षीयांनासुद्धा धक्का दिला. कालच जिल्हा बैठकीत सुजात आंबेडकर व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार याना उमेदवारी देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र आज वंचितने राजकीयदृष्ट्या बाजूला पडलेल्या वसंत मगर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Vijay Wadettiwar and Balasaheb Thorat Not Happy With Shivsena First List
“उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी
Raj Thackeray
मोठी बातमी! “राज ठाकरेंकडून लोकसभेसाठी महायुतीकडे ‘हा’ प्रस्ताव”, बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य चर्चेत
Sanjay Raut on Prakash Ambedkar lok sabha election 2024
वंचित बहुजन आघाडीच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

शिवसेनेतून त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. तत्कालीन प्रभावी नेते छगन भुजबळ यांच्यामुळे त्यांना १९९० मध्ये सिंदखेडराजा विधानसभेची उमेदवारी मिळाली. तेंव्हा त्यांना १८, ८३४ मते मिळाली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने, मगर यांनी १९९५ मध्ये भारिप बमसंकडून सिंदखेडराजा विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना १९ हजार ८६ मते मिळाली होती. अलीकडे ते राजकारणातून बाहेर पडले होते. वंचितने त्यांना उमेदवारी दिल्याने आता ते पुन्हा चर्चेत आले आहे.

हेही वाचा – मोदींचा फोटो खतांच्या बॅगवर, आचारसंहिता भंग म्हणून…

हेही वाचा – आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

२०१९चा ‘फॉर्म्युला’

दरम्यान वंचितने मागील २०१९ च्या लोकसभेत बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार याना बुलढाण्यातून मैदानात उतरविले. बुलढाण्यात लक्षणीय मतदान असलेला माळी समाज आणि वंचितचे हक्काचे आंबेडकरी मतदान लक्षात घेऊन रणनीती आखण्यात आली. त्या लढतीत वंचितने तब्बल १ लाख ७२ हजार मतदान घेत उलटफेर केला. त्यामुळे युतीचे प्रतापराव जाधव यांचा विजय सुकर झाला तर आघाडीचे राजेंद्र शिंगणे यांना मत विभाजनाचा फटका बसला. वंचित व आघाडीचे एकत्र मतदान युतीपेक्षा जास्त होते, हे विशेष