वाशीम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे यांनी स्मशानभूमीशी निगडित अंधश्रद्धांना मूठ माती देत येथील पद्मतीर्थ मोक्षधाम स्मशानभूमीत १३ जुलै रोजी साजरा केला आहे.

पुरोगामी विचारांचे खंदे कार्यकर्ते, शिव शाहू फुले आंबेडकरी विचारांचा वारसा संपूर्ण महाराष्ट्रात आधुनिक गाडगेबाबांच्या रूपाने सर्वत्र पोहोचवणारे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष पी. एस. खंदारे सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम ते करीत असतात. वाईट चालीरीती, अनिष्ट प्रथा परंपरा, बुवाबाजी व अंधश्रद्धांना बळकटी देणाऱ्या कृतींच्या विरोधात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करण्याचं काम महा अनिस च्या माध्यमातून जिल्ह्यात होत आहे.

हेही वाचा >>> भंडारा : मोक्षप्राप्तीच्या प्रवासातही नरकयातना; मांगली ग्रामस्थांच्या नशिबी ‘चिखलवाट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मशानभूमी हे अपवित्र किंवा भीतीचे ठिकाण नसून ते देखील इतर सर्व ठिकाणांप्रमाणे सामान्य आहे. त्यामुळे स्मशानभूमीची भीती मनात बाळगणाऱ्या चुकीच्या अंधश्रद्धांना मूठ माती देत स्मशानभूमीतच वाढदिवस साजरा केला. यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते  मधुकरराव जुमडे, सुनील कांबळे,  नाजुकराव भोंडणे, बाबाराव गोदमले, सुनील वैद्य, रमेश मोरे, एड.सेवेंद्र सोनोने, शाहिर दतराव वानखेडे, ग.ना.कांबळे, सिनेकलावंत अरविंद उचित, वानखेडे, जितेश कांबळे आदींची उपस्थिती होती.