देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मद्य पिऊ नका.. हे व्यसन जीवघेणे असते.. यामुळे कुटुंब व समाजही उद्ध्वस्त होतो.. असे संस्कार विद्यार्थ्यांना देणाऱ्या प्राध्यापकांचीच नियुक्ती चक्क मद्य दुकानांबाहेर करण्यात आली. मद्य खरेदी करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे अजब कार्य या प्राध्यापकांना सोपवण्यात आले. अकोला जिल्ह्य़ातील मूर्तिजापूरच्या तहसीलदाराच्या या निर्णयावर सर्व स्तरातून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर अखेर तहसीलदारांनी तो निर्णय मागे घेतला.

मद्य दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यानंतर मूर्तिजापूर तालुक्यातील तहसीलदारांनी मद्यविक्री दुकानांसमोर होणारी गर्दी आवरण्यासाठी चक्क प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली.   टाळेबंदीमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधून होणाऱ्या लूटमारीवर नियंत्रणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर काही प्राध्यापकांना सर्वेक्षण अधिकारी म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. मात्र, मूर्तिजापूरच्या तहसीलदारांनी यापेक्षा वेगळा निर्णय घेत प्राध्यापकांनाच मद्यविक्रीच्या दुकानासमोर उभे करण्याचा आदेश काढला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment of professors is outside the liquor shops abn
First published on: 08-05-2020 at 00:50 IST