बुलढाणा : खामगाव तालुक्यातील वरुड येथे जुन्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या सशस्त्र हाणामारीत १९ जण जखमी झाले असून सात गंभीर जखमींवर अकोला येथे उपचार सुरू आहे. गावात आज दुसऱ्या दिवशीही तणाव आणि कडक बंदोबस्त कायम आहे.

हेही वाचा – ‘ओबीसी’वरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा

वरूड येथे दोन गटांत गत काही दिवसांपासून वाद धुमसत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री दोन्ही गटांतील वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे पर्यावसान सशस्त्र हाणामारीत झाले. यात एकनाथ कोकाटे (४०), वैष्णवी कोकाटे (२४), शारदा कोकाटे (३२), शुभांगी कोकाटे (३२), अविनाश कोकाटे (२६), आकाश कोकाटे (२३), मारुती कोकाटे (४०), लोकेश कोकाटे (२३), योगेश कोकाटे (२६), संतोष कोकाटे (२६), रूपेश काकाटे (६०), मंगेश तायडे (३६), पूजा तायडे (२४), ललिता सोनोने (५५), सागर सोनोने (३२), विशाल सोनोने (४०), तपस्या सोनोने (१२) जखमी झाले. जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. काल रात्री उशिरा गंभीर जखमींना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.