बुलढाणा : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव नजीकच्या शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी आठ ते दहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यावेळी यामध्ये चोरट्यांनी लाठ्या, लोखंडी पाईप आणि चाकूने वार केल्याने महिलांसह चौघेजण जखमी झाले. लाखाचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाले. जखमींवर खामगाव उप जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा – अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांतील प्राध्यापकांची १०५ पदांची निर्मिती, पात्रताधारकांसाठी आनंदवार्ता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौरव मारुती तायडे कुटुंबासह बाळापूर मार्गावर गावापासून दोन किलोमिटर अंतरावर शेतामध्ये राहतात. मध्यरात्रीच्या आसपास आठ ते दहा चोरट्यांनी हातामध्ये काठ्या, चाकू व इतर साहित्य घेऊन घरामध्ये प्रवेश केला. तसेच समोर आला त्याला मारहाण केली. गौरव आणि त्याच्या भावाने विरोध केला असता चोरट्याने दोघांसह घरातील महिलांनाही मारहाण केली. रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला . खामगाव ग्रामीण पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. वरिष्ठांनी पाहणी केली. या घटनेमुळे खामगाव परिसरामधील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे.