व्होकार्ट रुग्णालयाच्या वतीने अथ्र्रायटिस दिनानिमित्त नागपूरला ‘वॉक फॉर लाईफ’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले. त्यात गुडघा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसह शहरातील ५० वषार्ंवरील अनेक नागरिकांनी सहभाग घेतला. अभियानाच्या माध्यमातून योग्य उपचाराने अथ्र्रायटिसचाही रुग्ण चालू शकतो हा संदेश नागपूरकरांना दिला गेला.
उपक्रमात सहभागी नागरिकांची मिरवणूक व्होकार्ट रुग्णालयातून शंकरनगर, अंबाझरी टी पॉईंट होत परत रुग्णालयात आली. त्यात गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपैकी एक जण म्हणाला की, मी पूर्वी अजिबात चालू शकत नव्हतो. आयुष्य निरस आणि पांगळे झाले होते. पण आता शस्त्रक्रियेनंतर मी सहज चालू शकतो. मला एक नवा आत्मविश्वास मिळाला आहे.
व्होकार्ट रुग्णालयात आजपर्यंत १ हजारांहून जास्त शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यातील बरेच रुग्ण मिरवणुकीत सहभागी झाले होते. यात व्होकार्टचे डॉ. लाघवेंदू शेखर म्हणाले की, हाडे आणि सांध्याची स्थिती ही दीर्घकालीन वेदना आणि शारीरिक दुर्बलतेचे सामान्य कारण आहे. जगभरात लाखो लोकांना हा त्रास आहे. या रुग्णांना आजाराबाबद योग्य जनजागृती होण्याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला आहे. व्होकार्ट रुग्णालयाच्या के. सुजाता, सुनील सहस्रबुद्धे, पंकज वैशंपायन यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांची आरोग्य तपासणीही याप्रसंगी करण्यात आली.