scorecardresearch

Premium

बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले “अपंगांच्या योजना…”

हे अभियान या उपक्रमापुरतेच मर्यादित न ठेवता अंमलबजावणीत सातत्य ठेवावे, अशा शब्दात ‘अपंग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

bachu kadu with disabled people
बच्चू कडूंनी टोचले अधिकाऱ्यांचे कान; म्हणाले ‘अपंगांच्या योजना

अकोला : अपंगांच्या अडचणींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी ‘मंत्रालय अपंगांच्या दारी’ अभियान महत्वाचे ठरत आहे. हे अभियान या उपक्रमापुरतेच मर्यादित न ठेवता अंमलबजावणीत सातत्य ठेवावे, अशा शब्दात ‘अपंग मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.

विविध प्रवर्गातील अपंगांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग अपंगांच्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार किरण सरनाईक, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा समाजकल्याण अधिकारी अनिल पुंड, सहायक आयुक्त मंगला मून आदी उपस्थित होते. या उपक्रमात शासनाच्या सर्व शासकीय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगांच्या तक्रारी जाणून घेऊन निपटारा करण्यात आला व विविध योजनांच्या लाभाचे वितरणही करण्यात आले.

sharad pawar ajit pawar onion selling
सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही; लिलाव सुरू करण्याचे आवाहन 
chagan bhujbal baban gholap
“…तेव्हा शिवसेना सोडण्याची इच्छा बाळगणाऱ्यांमध्ये बबन घोलप आघाडीवर”, छगन भुजबळ यांचा टोला
Cm Eknath shinde live speech in sambhajinagar
VIDEO: “आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले आणि…”, शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं विधान
unemployment
कंत्राटी भरतीविरोधात संतापाची लाट; राज्यभरातील विद्यार्थ्यांची आंदोलनाची तयारी

हेही वाचा >>> “भाजपच शिवसेना ठाकरे गट चालवतो…”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपाने खळबळ

ते म्हणाले, ‘अपंगांना प्राधान्याने घरकुले मिळवून देण्याबरोबरच अंत्योदय व इतर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. अपंगांच्या सर्वेक्षणात अकोला जि. प.ला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. जिल्ह्यातील नागरी भागात विशेषत: नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातही सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे. जिल्ह्यात ग्रामपंचायतींकडून पाच टक्के निधी खर्च होतो का? हे तपासावे. अपंगांना मिळणारे अर्थसाह्य नियमितपणे वेळेत मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत.’ कडू यांनी कार्यक्रमात उपस्थित अपंगांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व निपटारा करण्याचे आदेश यंत्रणेला दिले. कार्यक्रमातील भाषणे व माहिती मूकबधीर बांधवांना सांकेतिक भाषा सहायकाद्वारे सांगण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा >>> “निवडणूक आयोगाचा पेपर फुटला”, सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, “मला भीती वाटतेय, काही तरी गोलमाल…”

अपंगांना लाभाचे वितरण

४५ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आवास योजना, कृत्रिम अवयव आदी विविध लाभांचे वितरण करण्यात आले. अपंग कल्याण विभाग, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी विविध विभागांच्या ३८ कक्षांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याबरोबरच योजनांची माहितीही देण्यात आली. अपंग नोंदणीसाठीही स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्यात आले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bachu kadu instructions to officers plans for the disabled ministry ppd 88 ysh

First published on: 03-10-2023 at 17:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×