एकतर्फी प्रेमातून एका युवकाने तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केला.या प्रकरप्रकरणी पोलिसांनी गोलू ऊर्फ दुर्गा हरिचंद गौर (३२) रा. बजेरिया याला अटक केली. गोलू अनेक दिवसांपासून तरुणीचा पाठलाग करीत होता.

शनिवारी सायंकाळीही त्याने तिला रस्त्यात अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. तरूणीने त्याला फटकारले असता त्याने तिला शिवीगाळ केली. तिच्या कार्यालयात येऊन गोंधळ घालण्याची धमकी दिली. अश्लील वर्तन केले. पीडितेने घटनेची पोलिसात तक्रार केली.