भंडारा : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

रमेश भाजीपाले बुधवारी जंगलालगतच्या शेतात गुरे चारण्यासाठी गेले असता झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

भंडारा : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
पट्टेदार वाघाच्या  हल्ल्यात रमेश मोतीराम भाजीपाले (५०, रा. सावरला) यांचा मृत्यू झाला

भंडारा : पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सावरला वनक्षेत्रात पट्टेदार वाघाच्या  हल्ल्यात रमेश मोतीराम भाजीपाले (५०, रा. सावरला) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी उघडकीस आली. यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. रमेश भाजीपाले बुधवारी जंगलालगतच्या शेतात गुरे चारण्यासाठी गेले असता झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

सायंकाळी उशिरापर्यंत रमेश घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोध सुरू केला. आज सकाळी गावकऱ्यांना त्यांचा मृतदेह  छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. वनरक्षक वंजालवार यांना घटनेची माहिती देण्यात आली. पवनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे  आरएफओ बारसागडे यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह उत्तर तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे आणण्यात आला. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूर: चार जणांचे बळी घेणारा वाघ जेरबंद; ब्रम्हपुरी तालुक्यात घातला होता धुमाकूळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी