भंडारा : प्रचार आटपून लाखनीकडे परत येत असताना माजी पालकमंत्री परिणय फुके यांच्या वाहनाला अपघात झाला असून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या अपघातातून परिणय फुके सुखरूप बचावले.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी परिणय फुके हे गोंदिया जिल्ह्यात गेले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातून प्रचार आटोपून ते परत येत असताना साकोली जवळ फुके यांच्या वाहनासमोर अचानक वाहन आले. या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी रस्ता दुभाजकावर आदळली. हा अपघात इतका मोठा होता की, गाडीचे प्रचंड नुकसान झाले. या वाहनात फुके समोरच्या आसनावर बसले होते. त्यांनी सीटबेल्ट लावला असल्याने मोठा अनर्थ टळला. अपघातातून ते सुखरूप बचावले. साकोली पोलिसांनी घटनेची दाखल घेतली आहे.

Independent candidate Sevak Waghaye alleges against Congress Nana Patole
नाना, तुला मी आमदार बनविले, ‘तू किस खेत की…’; सेवक वाघाये यांचा आरोप
Speculation markets, Bhandara-Gondia, polls,
मतदानानंतर सट्टा बाजार तेजीत, भंडारा-गोंदियात उमेदवारांना किती मिळतोय भाव, जाणून घ्या….
independent candidate sevak waghaye using new technique of recorded voice calling for election campaign
भंडारा-गोंदिया क्षेत्राच्या उमेदवाराचा प्रचारासाठी नवा फंडा; रेकॉर्डेड व्हॉइस कॉल करून म्हणतात…
in Bhandara Campaigning Raises Questions on Nitin Gadkari that doing Self Promotion or candidate sunil mendhe s pramotion
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खा. सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी की स्वतःच्या?

हेही वाचा…पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल

अज्ञात वाहनाला धडकण्या आधीच वाहन चालकाने समयसूचकता दाखवल्याने मोठा अपघात टळला मात्र गाडी दुभाजकावर आदळल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले. सीटबेल्ट लावला असल्याने मी सुखरूप आहे. काळजी करू नये, असे परिणय फुके यांनी माध्यमांना सांगितले.