वाशीम : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने तयारी सुरू केले असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ८ जून रोजी जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली आहे.

वाशीम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी रिसोड मालेगाव विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून भाजपामध्ये दाखल झालेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे पुत्र ॲड. नकुल देशमुख यांची, तर कारंजा मानोरा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून राजू काळे यांची आणि वाशीम मंगरुळपीर विधानसभा प्रमुख म्हणून धनंजय हेंद्रे यांची निवड करण्यात आली. यासोबतच अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून खासदार धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, तर यवतमाळ वाशीम आगामी निवडणूक प्रमुख म्हणून नितीन भुतडा यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला बळकटी मिळवून देणे ही विधानसभा निवडणूक प्रमुखांची मुख्य जबाबदारी राहणार आहे.

हेही वाचा – अमरावती : निवड समितीअभावी वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले; समाजकल्याण विभागात प्रस्ताव धूळखात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेना शिंदे गटाचे कसे?

जिल्ह्यातील तीन विधानसभा व दोन लोकसभा मतदारसंघ निवडणुकांतील प्रमुखांची नावे भाजपाने जाहीर केली आहेत. सध्या भाजपा – शिवसेना शिंदे गटाची युती आहे. मात्र, आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत भाजपाने जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघाची तयारी सुरू केली असून, शिवसेना शिंदे गटाचे कसे? यावरून वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.