बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडून देण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेने त्यांचे समर्थक प्रक्षुब्ध झाले असून चाहत्यांतून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. अशा कृत्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या चिखली येथील निवासस्थानी एकत्र जमल्याचे वृत्त आहे. यानंतर चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आमदार श्वेता महाले या सुरक्षित असून त्या कोणत्याही अडचणीतून सावरतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, या प्रकारामुळे मतदारसंघातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. या घटनेचा तपास सुरू असून लवकरच दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास चिखली पोलिसांनी बोलून दाखविला  आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बस्फोटाद्वारे उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्याचे प्रकरण ताजेच असून दोन्ही संशयित आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील असल्याचे उघड झाले. अशातच आमदार श्वेता महाले यांना आलेली जीवे मारण्याची धमकी पोलीस प्रशासन गांभीर्याने घेत असून यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आमदार महाले यांचे समर्थक करत आहेत.