नागपूर : वन्यप्राणी आणि पक्ष्यांची ओळख त्यांच्या रंगावरुन लगेच  कळते. मात्र, काही जनुकीय बदलांमुळे प्राण्यांची कातडी थोड्याफार प्रमाणात रंग बदलते. ही सामान्य प्रक्रिया असली तरीही ‘अल्बिनो’ आणि ‘मेलॅनिस्टिक’ अशा दोनच संकल्पना माहिती आहेत. पेंच व्याघ्रप्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांचे प्राण्यांमधील रंगद्रव्यांची संकल्पना सांगणारे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स रिसर्च’ मध्ये प्रकाशित झाले आहे.

मेलॅनिन हे सस्तन प्राण्यांमध्ये आढळणारे मुख्य रंगद्रव्य आहे, जे केस आणि फर यांच्या रंगासाठी जबाबदार आहे. मेलॅनिनचे युमेलॅनिन आणि फेओमेलॅनिन हे प्रकार आहेत. ते काळ्या ते वालुकामय आणि वालुकामय ते लाल रंगांच्या वेगवेगळ्या संयोजनामध्ये एक प्रचंड रंगश्रेणी तयार करतात. मेलॅनिनचा विकास हा मेलॅनिन संश्लेषण नावाच्या जैवरासायनिक प्रक्रियेवर अवलंबून असतो, तो कोणत्याही त्रासामुळे किंवा अनुवंशिक उत्परिवर्तनाने प्रभावित होतो. म्हणजे मेलॅनिन संश्लेषणाच्या प्रत्येक टप्प्यावर मेलॅनिनच्या एकाग्रतेवर आणि वितरणावर परिणाम होतो. परिणामी रंग खराब होतो. सस्तन प्राण्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण त्वचार फार किंवा केसांनी परिधान केलेली असते आणि ती रंगामुळे प्रभावित होऊ शकते. साधारणपणे रंगातील बदल आसपासच्या हंगामी हवामान परिस्थितीवर आणि ते जेथे आढळतात, त्या भौगोलिक प्रदेशावर अवलंबून असते. याशिवाय वय, लिंग, आरोग्य आणि पोषण हे प्राण्यांच्या दिसण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे या संशोधनात म्हटले आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पात नियमित गस्तीदरम्यान सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर यांना पांढऱ्या रंगाचे सांबर हरिण, मानेच्या भागावर अर्धवट पांढरा रंग असलेले चितळ हरीण आणि नेहमीपेक्षा अधिक काळसर रंगाचे चितळ दिसून आले.

white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

अल्बिनिझम, ल्युसिझम, पायबाल्डिझम, मेलॅनिझम, हायपोमेलनिझम आणि ब्लू आयड मॉर्फ या वन्यप्राध्यांमध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्या स्वरुपाच्या फरकांसाठी सहा वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात. जंगलातील गस्तीदरम्यान निरीक्षण आवश्यक आहे. भारताच्या विविध भागात अशा स्वरुपाचे प्राणी दिसून येतात. निरीक्षणात आलेल्या बाबी वैज्ञानिक स्वरुपात मांडणे आवश्यक आहे, जेणेकरुन अशा गोष्टी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचतील.

अतुल देवकर, सहाय्यक वनसंरक्षक, पेंच व्याघ्रप्रकल्प