बुलढाणा : मेहकर नजीकच्या गवढाळा फाट्यानजीक झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आज, बुधवारी ही दुर्देवी घटना घडली. भरधाव दुचाकी व रोहीची धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, दुचाकीस्वार संतोष भिमसिंग राठोड (४२, राहणार पारखेड तालुका मेहकर) हे किराणा आणण्यासाठी तालुका स्थळ असलेल्या मेहकर येथे निघाले होते. दरम्यान, गवढळा ते भालेगाव मार्गावर समोरून येणारा रोही त्यांच्या वाहनाला धडकला. ताकदवान असलेल्या रोही या जंगली प्राण्याने दिलेल्या या धडकेमुळे संतोष राठोड हे अक्षरशः दूर फेकल्या गेले. घटनास्थळी ग्रामस्थ व वाहन चालकांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनी जवळ जाऊन पाहले असता, मृतक राठोड हे गंभीररित्या जायबंदी झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – घृणास्पद! जन्मदात्या वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – नागपूर : लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा यांनी घेतली ‘अग्निवीर’बद्दल माहिती

लोकांनी विचारणा केल्यावर त्यांनी नाव व गाव सांगितले. मात्र, त्यांनतर काही क्षणातच त्यांची प्राणज्योत मालवली. माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. अपघाताची माहिती कळताच पारखेड येथील राठोड परिवार आणि गावकरी यांना मानसिक धक्का बसला.