बुलढाणा : बुलढाण्यातील मराठा क्रांती मोर्च्याला प्रारंभ होण्यापूर्वी संभाव्य दुर्घटना टळली! जिजामाता व्यापार संकुलमधील गॅलरीतून एका आंदोलकाने खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी तैनात स्वयंसेवकांनी त्याला वेळीच रोखल्याने संभाव्य दुर्घटना टळली. यामुळे आयोजकांसह समाज बांधवांनी सुटकेचा श्वास सोडला.

हेही वाचा : अबब…नागपुरात दीड लाखाचा लाकडी बैल… काय आहे वैशिष्ट्य?, वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयस्तंभ चौक परिसरातील जिजामाता व्यापार व क्रीडा संकुलमध्ये जिल्ह्यातील समाज बांधव जमले. तिथून मोर्च्याला सुरुवात करण्याचे नियोजन होते. दरम्यान यावेळी मैदानात गर्दी झाल्याने काही जण प्रेक्षक गॅलरीत गेले. यापैकी एकाने तिथून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वयंसेवकांनी त्याला वेळीच पकडले. संभाजी भाकरे पाटील ( नांदुरा) असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. त्याची समजूत घालण्यात आल्यावर पुढील मोर्चा सुरळीत पार पडला.