लोकसत्ता टीम

गडचिरोली : वाढदिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापणे काही तरुणांना चांगलेच महागात पडले असून समाज माध्यमावर चित्रफीत सार्वत्रिक होताच पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.

Death of a passenger, Shahapur,
टिटवाळा येथे लोकल हल्ल्यातील शहापूर जवळील प्रवाशाचा मृत्यू, दोन हल्लेखोरांना अटक, दोन जण फरार
dombivli, thakurli, traffic jam, Thakurli flyover
डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार

केक कापण्यासाठी वापण्यात आलेली तलवार आणि आरोपींच्या गाड्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. लोकेश विनोद बोटकावार (२२), लोकमित्र खुशाल ठाकरे (२५), बादल राजेंद्र भोयर (२३), पवन मनोहर ठाकरे(२५), राहुल मनोहर नागापुरे (२८) सर्व राहणार बाजारटोली अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-बीडचा गोकुळ आवारे काटा कुस्ती दंगलमध्ये विजयी

आरमोरी शहरालगत रामाळा मार्गावर २५ नोव्हेंबररोजी रात्री ११ ते १२.३० वाजतादरम्यान वरील आरोपी तरुणांनी मित्राच्या वाढदिवशी हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापले. दरम्यान, त्यांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. सदर चित्रफीत समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाली. यात आरोपी तरुण हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे दिसून येत आहे.

याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या निर्देशानुसार आरमोरी पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित तरुणांवर हत्यार प्रतिबंधित कायद्यानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. यातील राहुल नागापुरे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.