नागपूर : चक्रीवादळाचा परिणाम अजूनही कायम असून देशातील काही राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तमिळनाडू, पुडुचेरी, केरळ-माहे आणि लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने काही राज्यांसाठी पावसाचा अंदाज दिला आहे.
देशातील काही भागांत थंडी वाढू लागली असतानाच पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजही काही भागांत पावसाची हजेरी लागणार असून येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस, गारपीट आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – तलाठी परीक्षेत गुणांची लॉटरी! चुकलेल्या प्रश्नांचे मिळणार ११४ गुण
हेही वाचा – नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा करू- देवेंद्र फडणवीस; ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचे उद्घाटन
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या मालदीव परिसरात चक्रीवादळामुळे पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. कर्नाटकातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.