चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरावे किंवा वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांना संधी द्यावी, अशी भूमिका काँग्रेसच्या केंद्रीय समितीने घेतली आहे. अन्य कुणाऐवजी प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस, मुलगी शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केल्याने वडेट्टीवार यांची अडचण झाली आहे.

हेही वाचा >>> “मोदींना रोखण्यासाठी विरोधकांकडून अफवांचा बाजार,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका; म्हणाले, “षडयंत्रापासून…

Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
congress leadership in delhi advised maharashtra leaders to follow alliance rule
आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला
Jalna Lok Sabha
जालना मतदारसंघात काँग्रेसमध्ये चिडीचूप
Congress fields Abhay Patil from Akola LS seat
अकोला : कोट्यवधींची मालमत्ता अन डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्याकडे…

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घोळ सुरू आहे. भाजपने येथे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे. मुनगंटीवार यांच्यासमोर ओबीसी समाजाचा बलाढ्य उमेदवार हवा, अशी भूमिका काँग्रेसच्या केंद्रीय समितीने घेतली आहे. त्यानुसार काँग्रेसने दिल्लीत तीन नावे पाठविली असली तरी केंद्रीय समितीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला. मात्र, वडेट्टीवार लोकसभा लढण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांनी मुलगी शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केले.

हेही वाचा >>> अमरावतीची जागा भाजपच लढणार!- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा, म्हणाले, ‘एकदा निर्णयानंतर काम करावेच…’

आमदार धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या वडेट्टीवारांची नेमकी इथेच चूक झाली. केंद्रीय समितीने वडेट्टीवार किंवा धानोरकर, अशी दोनच नावे लोकसभेसाठी निश्चित केली आहे. वडेट्टीवार लढण्यास तयार नसतील तर आमदार धानोरकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय केंद्रीय समितीने घेतला आहे. त्यामुळे धानोरकरांना उमेदवारी नको असलेल्या वडेट्टीवारांची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुंबईत नावाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.