scorecardresearch

 काँग्रेस नेते राहुल गांधी नोव्हेंबरमध्ये बुलढाणा जिल्ह्यात!

प्राथमिक माहितीनुसार, खा. राहुल गांधी २० नोव्हेंबर रोजी शेगाव येथे मुक्कामी असतील.

 काँग्रेस नेते राहुल गांधी नोव्हेंबरमध्ये बुलढाणा जिल्ह्यात!
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या बहुचर्चित पदयात्रेदरम्यान येत्या नोव्हेंबर महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत. या दौऱ्यानिमित बुधवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार, खा. राहुल गांधी २० नोव्हेंबर रोजी शेगाव येथे मुक्कामी असतील. त्यानंतर पुढील दोन दिवस जळगाव जामोद मतदारसंघातून त्यांची पदयात्रा जाणार आहे. यानंतर २३ नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही पदयात्रा महाराष्ट्रात आल्यावर नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला, बाळापूरमार्गे शेगाव, जळगाव जामोद येथे दाखल होणार आहे. येथून ही पदयात्रा मध्यप्रदेशकडे रवाना होईल.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress leader rahul gandhi to visit in buldhana district in november zws

ताज्या बातम्या