घुग्घूस : भारत माता की जय! देश की सेना का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान, तिरंगे का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान अशा घोषणा देत घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजु रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी एक वाजता काँग्रेस कार्यालयासमोरील परिसरात भारतीय सेनेचा अपमान करणारे मध्यप्रदेश येथील भाजपा नेते व मंत्री विजय शाह व उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांच्या प्रतिकात्मक चित्राला जोडे चप्पलने बडवत, शेण चिखल मारीत संतप्त पदाधिकारी व नागरिकांनी जाहीर निर्दशने केली.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकावर पाकिस्तानी दहशतवाद्यानी अतिरेकी हल्ला करून २८ भारतीय नागरिकांची हत्या केली. याभ्याड हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळावर हल्ला करून दहशतवादी तळ उध्वस्त केले.
भारतीय लष्कराच्या या कारवाईची माहिती कॅर्नल सोफिया करेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी देशाला दिली. मात्र जाती – पातीचे धर्माचे राजकारण करणाऱ्या सडक्या बुद्धीचे भारतीय जनता पार्टीचे मध्यप्रदेश येथील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानी आतंकवाद्याची बहीण असे संबोधित करून देशद्रोही कृत्य केले. याकृत्याची दखल स्वतः उच्च न्यायालयाने घेऊन विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला मात्र पोलिसांनी त्याच्यावर थातूर मातुर कारवाई केली.
अजून पर्यंत भाजपा तर्फे या मंत्र्याला बरखास्त करण्यात आले नाही. सैनिक देशाचे गर्व असतात मंत्री किंवा प्रधानमंत्रीचे हस्तक नसतात मध्य प्रदेशाचे उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांनी ही भारतीय लष्कराचा अपमान करीत त्यांना मोदीच्या चरणी नतमस्तक असल्याचे सांगितले तर दुसरीकडे सैनिकांच्या शौर्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी तिरंगा यात्रा काढणारे भाजपाचे राजस्थान येथील आमदार बालमुकुंद आचार्य यांनी तिरंगा असलेल्या दुपट्टाने नाक पुसून तिरंग्याचा अपमान केला आहे.
मात्र यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने काँग्रेस तर्फे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, तालुका सचिव विशाल मादर,ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन, ज्येष्ठ नेते अनिरुद्ध आवळे, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, एस्सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,जिल्हा सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल, सरस्वती कोवे,जोया शेख,वैशाली पोपटकर, दुर्गम्मा आरापेल्ली, सगुणम्मा डोमा, , बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, देव भंडारी, दीपक पेंदोर, कुमार रुद्रारप,शहंशाह शेख, नाणी मादर, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, आयुष आवळे, साहिल आवळे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिकगन उपस्थित होते.