तरुण उद्योजक साकेत चौरे यांचा नागपुरात प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरगुती स्वयंपाकासाठी गॅस सहज आणि सुलभतेने केवळ तीन तासात उपलब्ध करण्याची संकल्पना घेऊन एलपीजी बॉटलिंग प्लॅन्ट  नागपूरमध्ये सुरू केला. लोखंडी ऐवजी फायबर सिलिंडर वापरण्यात आले. एलपीजीला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा हा प्रयत्न आहे, असे ‘ब्ल्यू’ एलपीजी गॅस प्रायव्हेट लि.चे सर्वेसर्वा साकेत चौरे यांनी सांगितले.

नवउद्यमी चौरे यांना व्यावसायिक पार्श्वभूमी नाही. बीबीएचे शिक्षण घेताना इमारत साहित्य पुरवण्याचा व्यवसाय दोन वर्षे केला. त्यानंतर २०१५ मध्ये ‘ब्ल्यू एलपीजी गॅस प्रायव्हेट लि.’ची स्थापना केली. वयाच्या २४ व्या वर्षी  ते एका कंपनीचे मालक झाले आहेत.  त्यासाठी वडिलांच्या नवावरील भूखंडावर कर्ज घेतले आणि आईच्या नावाने असलेल्या भूखंड भाडय़ाने घेऊन एलपीजी गॅस प्लॉट  उभारला.

यासाठी दीड वर्षे विविध परवाने मिळवण्यात गेले. ५ फेब्रुवारी २०१९ ला अंतिम परवानगी मिळाली. विदेशातील गॅस आणून नागपुरात सिलिंडर भरण्यात येत आहेत. ते सिलिंडर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. आठ दिवसात १५० ग्राहक झाले आहेत. दरम्यानच्या काळात २० युवकांना एजन्सी देण्यात आली आहे.  विनाअनुदानित घरगुती स्वयंपाक गॅस जोडणी सुलभतेने दिली जाते. तसेच संपल्यानंतर पुन्हा हवा असल्यास फोन केल्यावर तीन  तासात उपलब्ध केले जाते. संपूर्ण विदर्भात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विस्तार करायचा आहे. देशात एलपीजी गॅस पुरवणाऱ्या ४० कंपन्या आहेत. एकेका कंपनीकडे ३० ते ४० हजारांहून अधिक ग्राहक आहेत. आमच्या कंपनीला नागपुरात केवळ ३ टक्के ग्राहक हवे आहेत. म्हणजे जास्तीत जास्त ३० हजार ग्राहक हवे आहेत. ते आम्ही पुढील काही महिन्यात प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिलेंडर वजनाला हलके

दिल्लीत २०१५ ला एशिया एलपीजी समिट होते.  तेथे नॉन एक्स्लोसिव्ह फायबर सिलिंडर होते. हे सिलिंडर लोखंडी सिलिंडरपेक्षा आठ किलोने हलके आहे. तसेच दिसायला सुंदर आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cooking gas will be available in three hours
First published on: 22-02-2019 at 00:56 IST