scorecardresearch

तिसऱ्या लाटेत प्रथमच ‘तीन हजारी’!

करोनाच्या तिसऱ्या लाटेत रोज रुग्ण वाढत असतानाच बुधवारी रुग्णसंख्या थेट तीन हजारांवर पोहोचली.

Omicron new coronavirus variant deltacron emerges in Cyprus
(प्रातिनिधिक छायाचित्र)

२४ तासांत ५ मृत्यूनेही चिंता वाढवली 

नागपूर : करोनाच्या तिसऱ्या लाटेत रोज रुग्ण वाढत असतानाच बुधवारी रुग्णसंख्या थेट तीन हजारांवर पोहोचली. सोबतच पाच रुग्णांचा मृत्यूही झाला. करोनाच्या तिसऱ्या लाटेत हा मृत्यू व नवीन दैनिक रुग्णांचा उच्चांक आहे. करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये शहरातील २ हजार ७६७, ग्रामीण ५२९, जिल्ह्याबाहेरील ९१ अशा एकूण ३ हजार २९६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ५९ हजार ३६०, ग्रामीण १ लाख ५० हजार १०५, जिल्ह्याबाहेरील ७ हजार ७६१ अशी एकूण ५ लाख १७ हजार २२६ रुग्णांवर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात ४, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण ५ रुग्ण दगावले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची मृत्यूसंख्या ५ हजार ९०७, ग्रामीण २ हजार ६०४, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६३० अशी एकूण १० हजार १४१ रुग्णांवर पोहचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात १ हजार ५४, ग्रामीणला २३६, जिल्ह्याबाहेरील ५५ असे एकूण १ हजार ३४५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ४० हजार ३१९, ग्रामीण १ लाख ४४ हजार ५६२, जिल्ह्याबाहेरील ५ हजार ९६२ अशी एकूण ४ लाख ९० हजार ८४३ रुग्णांवर पोहचली आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण २६ टक्के

शहरात दिवसभरात ९ हजार ६५५, ग्रामीणला २ हजार ९३४ अशा एकूण जिल्ह्यातल १२ हजार ५८९ संशयितांनी चाचणी केली. त्यात शहरात २,७६७ रुग्ण, ग्रामीण ५२९ रुग्ण, जिल्ह्याबाहेरील ९१ असे एकूण जिल्ह्यात ३,२९६ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यानुसार चाचण्यांच्या तुलनेत शहरात सकारात्मक अहवालाचे प्रमाण २८.६५ टक्के, ग्रामीणला १८.०२ टक्के तर जिल्ह्यात २६.१८ टक्के नोंदवले गेले.

सक्रिय करोनाग्रस्त १६ हजारांहून अधिक

शहरात १३ हजार १३३, ग्रामीणला २ हजार ९३९, जिल्ह्याबाहेरील १७० असे एकूण १६ हजार २४२ सक्रिय रुग्ण आहेत. ही संख्या १ जानेवारीला केवळ ३२२ रुग्ण इतकी होती.

विदर्भात ८ मृत्यू, साडेसहा हजार रुग्ण

विदर्भात दिवसभरात ८ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच साडेसहा हजाराच्या जवळपास नवीन रुग्ण आढळले आहेत. दगावलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ५ रुग्ण नागपुरात, १ रुग्ण यवतमाळ, १ रुग्ण बुलढाणा, १ रुग्ण वर्धा जिल्ह्यात दगावला.  २४ तासांत नागपुरात ३,२९६, अमरावती ४३८, चंद्रपूर ६२०, गडचिरोली २०१, यवतमाळ २००, भंडारा २४८, गोंदिया १५६, वाशीम ११९, अकोला ३९८, बुलढाणा ३७५, वर्धा जिल्ह्यात ४१४ असे एकूण विदर्भात ६ हजार ४६५ नवीन रुग्ण आढळले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona patients infected deaths third wave ysh

ताज्या बातम्या