scorecardresearch

प्रभागातील अंतर्गत सिमेंट रस्त्यालाही भेगा

निवडणुकीच्या लगीनघाईच्या अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत.

cement road
सिमेंट रस्त्यांवर भेगा पडल्या असल्यामुळे पुन्हा एकदा सिमेंट रस्त्याचा घोळ चव्हाटय़ावर आला आहे.

रस्त्याचे ऑडिट करणार का?

शहरातील मुख्य रस्त्यासोबत प्रभागातील विविध वस्त्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांवर भेगा पडल्या असल्यामुळे पुन्हा एकदा सिमेंट रस्त्याचा घोळ चव्हाटय़ावर आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे ऑडिट करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

निवडणुकीपूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच विविध प्रभागातील वस्त्यांमध्ये अंतर्गत रस्ते सिमेंटचे करण्यात आले असून काही भागात कामे सुरू आहे. भाजपने निवडणुकीच्या वेळी सिमेंट रस्ते केले आणि मते मागितली. निवडणुकीच्या लगीनघाईच्या अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड होत आहे. पडलेल्या भेगा महापालिकेच्या पारदर्शी कारभारावर देखील बोट ठेवत आहे. पालिकेवर सत्ता आल्यानंतर धडाक्यात सुरू असलेले प्रभागातील सिमेंट रस्त्यांची कामे मंदावली आहे. कंत्राटदारांनी प्रभागातील रस्ते तयार केले मात्र लगतचे फूटपाथ उघडे पडले आहे. अनेक रस्त्याची कामे अपूर्णवस्थेत आहे. मित्रनगर, नाईक नगर, दसरा रोड या भागातील रस्त्यांची कामे निवडणुकीपूर्वी करण्यात आली. गजानन महाराज मंदिराकडे जाणारा मार्ग सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्यावरून ठिकठिकाणी भेगा गेल्या आहे. गेल्या महिन्यात या तयार मार्गावरील एका भागावर बॅरिकेटिंग करून पुन्हा काम करण्यात आले.

सिमेंट रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याची ओरड होत असताना कंत्राटदाराची रस्त्यावरील भेगा लपविण्याची धावधाव सुरू झाली आहे. भेगावर सिमेंटचा मुलामा चढवून त्या लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि महापालिकेचे त्यावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यावरील सिमेंट रस्त्याचे ऑडिट केले जाणार असले तरी प्रभागातील विविध वस्त्यांमधील रस्त्याच्या कामाचे ऑडिट करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्य रस्त्यावरील सिमेंट रस्त्याचा दर्जा चांगला नसला तरी प्रभागातील सिमेंट रस्त्याची सुद्धा अशीच अवस्था आहे. या जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू असून संबंधीत कंत्राटदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विरोध पक्ष नेते संजय महाकाळकर यांनी केली.

महापालिका आयुक्तांकडून झोपडपट्टी व रस्त्यांची पाहणी

नागपूर : स्वच्छतेमध्ये नागपूर शहर माघारल्यानंतर महापालिका आयुक्त अश्विन मुदगल यांनी सुटीच्या दिवशी हनुमाननगर आणि आशीनगर झोनचा दौरा करून विविध भागातील झोपडपट्टी, रस्त्याची पाहणी केली.

अशोक चौकापासून पाहणीला प्रारंभ केल्यानंतर मेडिकल चौक, तुकडोजी चौक, मानेवाडा चौक, रिंग रोड, तपस्या विद्यालय ते सिद्धश्वरी झोपडपट्टीची पाहणी केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडलेले बांधकाम साहित्य तातडीने उचलण्याची सूचना केली. वीज खांबावर अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर, फ्लेक्स त्वरित काढण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे खांबावरील सर्व अनधिकृत प्लेक्स हटविण्यात आले. फ्लेक्स हटविणे ही वीज मंडळाची जबाबदारी असल्याचे अभियंत्यांनी आयुक्तांना सांगितले.

सिद्धेश्वरी झोपडपट्टीत आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात काही लोक उघडय़ावर शौचास जाताना दिसले. या ठिकाणी शौचायलयाची अस्थायी व्यवस्था करण्यात आली असताना लोक रस्त्यावर शौचाला बसतात. या भागात तात्काळ शौचालये निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आयुक्तांनी ओंकारनगरला भेट देऊन पोरा नदीच्या पात्राची पाहणी केली. नदी स्वच्छता अभियानाचे निरीक्षण करताना डॉ. सोनवणे यांनी उत्तरेकडील वळणावर नदी पात्राची रुंदी वाढविण्याची सूचना केली. यावेळी अश्विनी मुदगल यांनी रामटेके नगर व टोळी या नव्या प्रभागाची पाहणी केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-05-2017 at 02:19 IST