scorecardresearch

Dahi Handi 2022 : नागपूर – जन्माष्टमीच्या सुटीचा ‘सरकारी’ घोळ; शाळांना सुटी तर महाविद्यालये आणि कार्यालय मात्र सुरू

Dahi Handi 2022 Celebration:अनेकांनी सुटी आहे असे गृहीत धरले होते, पण ऐनवेळी सुटी नसल्याचे समजल्याने त्यांची तारांबळ उडाली

Dahi Handi 2022 : नागपूर – जन्माष्टमीच्या सुटीचा ‘सरकारी’ घोळ; शाळांना सुटी तर महाविद्यालये आणि कार्यालय मात्र सुरू
(संग्रहीत छायाचित्र)

Dahi Handi 2022 Celebration : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी उत्साहात जन्माष्टमीची सुटी जाहीर केली. पण आदेश काढताना तो फक्त मुंबईसाठी काढला. त्यामुळे घोळ झाला. अनेकांनी आज सुटी आहे असे गृहीत धरले होते. पण ऐनवेळी त्यांना सुटी नाही, असे कळल्याने त्यांची तारांबळ उडाली.

मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केल्याने सुटी संपूर्ण महाराष्ट्रासाठी असेल असा समज सरकारी, गैरसरकारी कर्मचाऱ्यांचा झाला. अनेकांनी सुटीचे नियोजन केले. काही शाळांनी सुटी जाहीर केली. पण गुरूवार पर्यंत सरकारी सुटीचे आदेश निघाले नाहीत. त्यामुळे सरकारी कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, सरकारच्या अखत्यारीतील सर्व अस्थापनांची कार्यालये आज (शुक्रवार) सुरू होती.

कर्मचाऱ्यांनी चौकशी केल्यावर त्यांना सुटी फक्त मुंबईसाठीच असल्याचे सांगण्यात आले. विदर्भात जन्माष्टमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असताना, सरकारने फक्त मुंबईपुरती सुटी जाहीर करावी याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.