नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान शंकरावर ‘देवाधी देव’ हे शिवगीत लिहिले असून ज्येष्ठ गायक व संगीतकार शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांनी त्या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या गीताचे लोकार्पण करण्यात आले. लोकसभा निवडणुकीनिमित्त राज्यात राजकीय धामधूम सुरू असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शिवगीत लिहून काढले. ते आता लोकप्रिय होऊ लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे या गीताची माहिती दिली.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने माझ्याकडून ‘देवाधी देव’ हे गीत भगवान शिवाला अर्पण केलेला खास प्रसाद आहे. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन आणि अमृता फडणवीस यांचे सूर छान जुळून आले आहेत. भगवान शिवशंकर यांच्याबद्दलच्या स्तुती आणि भक्तीचे शब्द यात आहेत.

Eknath Shinde Chhagan Bhujbal (1)
अमोल कोल्हेंविरोधात शिरूरमधून लोकसभेची ऑफर होती? भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला…”
eknath shinde and 40 mla joined the bjp because of fear of arrest says aditya thackeray
आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’
Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election 2024
विजय शिवतारे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना शब्द; म्हणाले, “बारामतीच्या विजयामध्ये पुरंदरचा सिंहाचा वाटा असेल”
Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत

हेही वाचा…नागपूर, रामटेक मतदारसंघांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत घोळ सुरूच

काही दिवसापूर्वी अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असताना देवेंद्र फडणवीस यांनी बडकस चौक येथील कार्यक्रमात राम जन्मभूमी आंदोलनाच्या विविध कार्यक्रमातून गायले जाणारे जागो तो हिंदू जागो तो… एक बार जागो जागो जागो तो… हे गीत सादर करत युवकामध्ये जोश निर्माण केला होता. हे गीत लोकप्रिय झाले होते. आता प्रभू रामचंद्राच्या गीतानंतर शिवगीत लोकप्रिय होत आहे.