बुलढाणा : बालाजी नगरी म्हणून प्रसिद्ध देऊळगाव राजामध्ये एका इसमाकडून तब्बल २४ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. यामुळे ही नगरी गांजा तस्करीचे केंद्र बनत चालली की काय, अशी शंका व्यक्त होत आहे.

हेही वाचा – नागपुरात प्रथमच ‘एसटी’ची महिला कर्मचारी उपोषणावर, विभाग नियंत्रकांवर आरोप काय?

हेही वाचा – सासरा हॉलमध्ये टीव्ही बघतो, नवरा कुत्रा बांधून ठेवत नाही म्हणून घटस्फोटासाठी आलेल्या २३ कुटूंबांचे मनोमिलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत किसन मंडळकर ( ५०, रा. संजयनगर ) याच्याकडून २४ किलो ३०० ग्राम गांजा जप्त केला. याची किंमत २ लाख ९१ हजार रुपये इतकी आहे. यासह वाहतूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारे दुचाकी वाहन, मोबाईल मिळून एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. प्रकरणी आरोपी मंडळकर विरुद्ध अंमली औषध द्रव्ये व मन:प्रभावी पदार्थ अधिनियमनुसार देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.