आहारतज्ज्ञ डॉ. स्नेहा फाफट यांचे आवाहन * लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : दिवाळी हा  दिव्यांचा-रोषणाईचा उत्सव. रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकारांचे, एकाहून एक  फराळचे पदार्थ ही दिवाळीची विशेषता, मात्र लहान मुलांनी फराळाच्या पदार्थाचा आस्वाद कसा आणि किती घ्यावा याचा विचार झाला पाहिजे, असे मत आहारतज्ज्ञ डॉ. स्नेहा फाफट यांनी व्यक्त केले.

contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. स्नेहा फाफट  म्हणाल्या, दिवाळीच्या दिवसात घरोघरी चिवडा, शंकरपाळे, चकली, बेसनाच्या वडय़ा, शेव आदी पदार्थ तयार केले जातात. सकाळ, संध्याकाळ फराळावर ताव मारला जातो. त्याचा परिणाम लहान मुले व ज्येष्ठांच्या जेवणावर होत असतो.  दिवाळीत पोटदुखी, आम्ल, डोकेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असते. अनेक लोक फराळाचे पदार्थ घरी न करता बाहेरून विकत घेतात. ते कुठल्या तेलात तयार केले जातात याची माहिती त्यांना नसते. चवीला चांगले असल्यामुळे आपण ते विकत घेत असतो. मात्र हे बाहेरचे फराळाचे पदार्थ अनेकदा आरोग्यासाठी चांगले नसतात.  फराळ करणे वाईट नाही मात्र तो किती प्रमाणात करावा याबाबत पालकांनी आपल्या मुलांना जागृत केले पाहिजे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांनी जागृत असले पाहिजे.

दिवाळीच्या दिवसात तेला-तुपाची योग्य निवड करणे व ते वापरणे फार महत्त्वाचे आहे. आपण एकदा डीप फ्राय केलेल्या तेलामध्ये पुन्हा-पुन्हा पदार्थ तळणे कटाक्षाने टाळले पाहिजे. तळलेल्या पदार्थात ‘ट्रान्स फॅटी सिड’ तयार होतो. ते सुद्धा एक रोगाचे मुख्य कारण असते. याशिवाय भरपूर पाणी प्या, मॉर्निग वॉक करा आणि काही व्यायाम अवश्य करा. जर आपण कोणतेही औषध घेत असाल तर ते वेळेत घ्यावे. फराळाचे पदार्थ चालत नसेल तर काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. पोषणमूल्य असलेले पदार्थ खाणे नेहमीच हितकारक ठरते. कोणत्या वेळी कोणता आहार घ्यावा यावर आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कॅल्शियम हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दूध, दही, ताक यामधून कॅल्शियम मिळते, त्यामुळे त्याचे भरपूर सेवन करा.

बाहेरचे खाणे बंदच करा. दिवाळीच्या दिवसात स्वत:ला  निरोगी ठेवावे जेणेकरून वजन वाढू नये आणि जीवनशैलीशी संबंधित कोणताही आजार होणार नाही.  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ. यासाठी अति फराळ आणि गोडधोड पदार्थावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. किमान ४० अन्नघटक आहारात असावे. धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध दही, ताक, तेल, तुपापासून ते मिळतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषकतत्त्वाची गरज असते. प्रदूषणामुळे साथीच्या तसेच पेशीचा ऱ्हास होणाऱ्या अनेक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे संतुलित आहार घेतला पाहिजे. बरेच लोक व्यायाम करतात पण निरोगी जीवनशैली अजिबात पाळत नाही. विशेषत: तरुणवर्ग निरोगी जीवनशैलीचे अजिबात पालन करत नाही. दिवसभरात कोणते पदार्थ कधी आणि कसे खावे याचे कोणतेही नियम नसले तरी आपली जीवनशैली बघता पोषक आहार करणे आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.