गोगलगायीच्या नव्या प्रजातीचा शोध

करड्या काळसर रंगाची ही गोगलगाय सात सेंटिमीटरपर्यंत वाढते.

‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी’मध्ये माहिती प्रसिद्ध

नागपूर : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील आंबोली गावातून गोगलगायीची नवी पोटजात व प्रजातीचा शोध घेण्यात संशोधकांना यश आले आहे. पोटजातीचे ‘वरदिया’ व प्रजातीचे ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे नामकरण करण्यात आले आहे. ‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमी’ या संशोधन नियतकालिकामध्ये मंगळवारी हा पेपर प्रसिद्ध झाला.

कोल्हापुरातील शिवाजी महाविद्यालयात पीएचडीदरम्यान गोगलगायीवर काम करणाऱ्या डॉ. अमृत भोसले यांना सप्टेंबर २०१७ मध्ये ही प्रजाती सर्वप्रथम आढळली. त्यानंतर २०१९ आणि २०२०च्या पावसाळी ऋतूतही ती आढळली. डॉ. भोसले यांनी पाच वर्षांच्या कालावधीत के लेल्या व्यापक संशोधनातून तसेच लंडन येथील नॅचरल हिस्ट्री संग्रहालयाचे वैज्ञानिक सहयोगी डॉ. दिनारझार्डे रहीम यांच्या प्रयत्नातून हा शोध लागला. या नवीन गोगलगायीचा अभ्यास करताना ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठाचे अहमद सादी, लंडन येथील नॉटिंघम विद्यापीठाचे ख्रिस्तोफर वाडे, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे तेजस ठाकरे, कोरियातील क्युंगपुक राष्ट्रीय विद्यापीठाचे आसिफ तांबोळी, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे सुहास कदम, डॉ. डी.व्ही. मुळे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या नव्या शोधामुळे शंखधारी गोगलगायीच्या प्रजातीत नव्या पोटजातीची आणि प्रजातीची भर पडली आहे. सिंधुदुर्गातील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आंबोली गावातील ‘ शिस्तुरा हिरण्यके शी जैविक वारस स्थळा’तून याचा शोध लागला. पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारी प्रजाती जगात इतरत्र कु ठेही आढळून येत नाही. शिस्तुरा हिरण्यके शी जैविक वारसा स्थळासह आंबोली धबधबा, आंबोली वनउद्यान, तिलारतील कोडीळी व कर्नाटकातील याना वनक्षेत्रात ती आजवर आढळली. साधारणत: पानांच्या कचऱ्यांमध्ये किं वा जंगलातील झाडांवर राहणारी व  रात्री सर्वाधिक सक्रि य असणारी गोगलगाय इतर गोगलगायींप्रमाणेच आद्रता असणाऱ्या ठिकाणी आढळते. आंबोली धबधब्यानजीक झाडावर, पालापाचोळ्यांमध्ये, दगडावर आणि हिरण्यके शी मंदिराच्या भिंतीवरही ती आढळते. करड्या काळसर रंगाची ही गोगलगाय सात सेंटिमीटरपर्यंत वाढते.

पोटजातीचे नामकरण

गोगलगायीच्या या नव्या पोटजातीचे नामकरण भारतातील ज्येष्ठ सरीसृप आणि उभयचर शास्त्रज्ञ तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे उपसंचालक डॉ. वरद गिरी यांच्या नावे ‘वरदिया’ असे करण्यात आले आहे.  प्रजातीचे नामकरण आंबोलीच्या नावे ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे करण्यात आले. डॉ. वरद गिरी हे तरुण संशोधकांना समोर आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.  त्यांनी सरीसृप आणि उभयचर जीवांमधील तीन पोटजाती आणि ५७ प्रजाती शोधून काढल्या असून ५ प्रजाती आणि एका पोटजातीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

आंबोली गावातील ‘ शिस्तुरा हिरण्यके शी जैविक वारस स्थळात’ आढळणाऱ्या आणखी एका गोगलगायीच्या प्रजातीबरोबर साम्य साधणारी ही प्रजाती होती. त्यामुळे या नव्या प्रजातीचे नमुने गोळा के ले. या नमुुन्यांची डीएनए तपासणी, शंखाचा आकारशास्त्रीय अभ्यास आणि रिप्रॉडक्शन सिस्टमचे निरीक्षण के ल्यावर ही के वळ नवीन प्रजातच नाही तर गोगलगायीची नवी पोटजात असल्याचे कळले. – डॉ. अमृत भोसले, संशोधक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Discovery of a new species of snail akp