नागपूर: ‘डेंग्यू’ने आता चार डॉक्टरांसह गर्भवती व बाळंत महिलांनाही विळख्यात घेतले आहे. त्यामुळे नागपुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डागा रुग्णालयात आलेल्या दोन गर्भवतींसह एक बाळंत महिलेत डेंग्यूचे निदान झाले असून येथे कार्यरत चार डॉक्टरांनाही डेंग्यू झाल्याचे पुढे आले आहे.

हेही वाचा – सना खान यांचा मृतदेहाबाबत माहिती देणाऱ्यास एका लाख देणार

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा

हेही वाचा – क्रौयाची सीमा! अल्पवयीन पीडितेच्या गुप्तांगाला चटके, अनैसर्गिक अत्याचार, डॉक्टरांच्या अंगावर आला काटा

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात कार्यरत दोन डॉक्टरांसह येथे प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा देण्यासाठी आलेल्या दोन निवासी डॉक्टरांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू असल्याचे निदान झाले. चारही डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे. डागा रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर या माहितीला दुजोरा दिला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांनी मात्र एकाच डॉक्टरला डेंग्यू झाल्याचा दावा केला.