हक्काच्या सुट्या नाकारल्यामुळे पोलीस मुख्यालयात कार्यरत एका पोलीस हवालदाराने थेट माहिती अधिकारात अर्ज दाखल करून पोलीस उपायुक्तांना माहिती मागितली आहे. ते पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने शिस्तप्रिय पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.मागील काही महिन्यांपासून पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी विविध कारणांमुळे आजारी रजेवर जाण्याचा पर्याय शोधला आहे. मुख्यालयातील निरीक्षक दर्जाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देत अपमानित करतात तसेच ‘रोल कॉल’साठी ५ ते १० मिनिटे उशिर झाल्यास दिवसभराची अनुपस्थिती लावली जात असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पाठपुरावा करून पोलीस कर्मचाऱ्यांना १२ ऐवजी २० किरकोळ रजा मंजूर केल्या. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचे कारण करून सुट्या नाकारल्या जातात. केवळ मर्जीतील कर्मचाऱ्यांना वारंवार सुट्या देण्यात येत असल्याचेही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षांची शिक्षा; शासकीय मालमत्तेचे नुकसान भोवले

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the denial of leave the police constable filed an application in the rti adk 83 amy
First published on: 13-12-2022 at 08:54 IST