scorecardresearch

शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “‘AU’ नावाची…”

एकनाथ शिंदे म्हणतात, “त्या केसच्या संदर्भात…”

शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “‘AU’ नावाची…”
एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

दिवंगत अभिनेत सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन कॉल करण्यात आले होते. ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती.

राहुल शेवाळे लोकसभेत काय म्हणाले?

“रिया चक्रवर्तीच्या फोन कॉल्सचा तपास केला गेला का? किंवा ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती, त्यांच्यात मैत्री होती, हे खरं आहे का? बिहार पोलिसांच्या तपासात ‘एयू’चा उल्लेख करण्यात आला. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला ‘AU’ संपर्क क्रमांकावरून ४४ फोन कॉल आले. ‘AU’चा अर्थ ‘अनन्या उद्धव’ असा काढण्यात आला. पण बिहार पोलिसांनी केलेल्या तपासात ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा काढण्यात आला आहे, याचाही तपास व्हायला हवा,” असं राहुल शेवाळेंनी लोकसभेत म्हटलं होतं.

हेही वाचा : “A फॉर आफताब अन् A फॉर आदित्य, सगळ्या विकृतीचे नाव एकच”, सुशांतसिंह प्रकरणावरून नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले…

“‘AU’ हा विषय अतिशय गंभीर आहे. ‘AU’चा अर्थ अनन्या उद्धव असा नाही, ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, हे बिहार पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयचा तपास वेगळा आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. याची माहिती लोकांना मिळायला हवी,” असेही राहुल शेवाळे म्हणाले.

राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर गेलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यातच यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे. “‘AU’ नावाची माहिती घेतो. त्या केसच्या संदर्भात महाराष्ट्रातील लोकांच्या मनात संभ्रम होता, आजही आहे. नक्की त्याची माहिती घेऊन बोलतो,” असं एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : “अध्यक्ष महोदय हे काय चाललंय?”, अजित पवारांनी भर सभागृहात विचारला जाब; सरकारला पाठिशी घालण्याचा आरोप!

“त्यांचं लग्न आमच्या घराण्याने…”

रिया चक्रवर्तीला फोन करण्याच्या आरोपांबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राचे विषय बाजुला जावेत, म्हणून असे घाणेरडे विषय काढून बदनामी केली जात आहे. यामध्ये मला जायचे नाही. मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राद्वेषी राज्यपालांना वाचवण्यासाठी असे घाणेरडे विषय बाहेर काढले जात आहेत. मी राहुल शेवाळेंना काडीमात्र किंमत देत नाही. त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं, हे मला माहीत आहे. मला काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही. कारण माझे तसे संस्कार नाहीत. म्हणून मी त्या घाणीत जाणार नाही,” असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी शेवाळेंच्या आरोपांवर दिलं आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 12:56 IST

संबंधित बातम्या