scorecardresearch

काय सांगता…? एका विद्यार्थ्यासाठी एक अख्खी शाळा!

राज्यातील शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या जि.प.शाळा बंद करण्याच्या विचारात सरकार असताना सर्वत्र विरोध झाला आणि सरकार नरमले.

काय सांगता…? एका विद्यार्थ्यासाठी एक अख्खी शाळा!
सद्यस्थितीत अनेक जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत.

वाशिम : एकेकाळी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. परंतु गावा गावात खासगी शाळांचा प्रवेश झाला आणि पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला. राज्यातील शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या जि.प.शाळा बंद करण्याच्या विचारात सरकार असताना सर्वत्र विरोध झाला आणि सरकार नरमले. परंतु सद्यस्थितीत अनेक जिल्हा परिषद शाळा ओस पडत चालल्या आहेत. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गणेश येथील शाळेची केवळ १ पटसंख्या असून तिथे केवळ एक विद्यार्थी आहे. त्याला शिकवण्यासाठी एक शिक्षकही आहे.

हेही वाचा >>> अखेर उलगडा, गडकरींना धमकीचा फोन बेळगावमधून!, गुन्हे शाखेचे पथक तत्काळ रवाना

वाशीम जिल्ह्यात गणेशपूर (गुरव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. येथे १ ते ५ पर्यंत इयत्ता आहेत.  या शाळेत केवळ एकच विद्यार्थी आहे. तो  तिसऱ्या वर्गात शीकतो.  त्याचे नाव कार्तीक बंडू शेगोकार  आहे.   या शाळेचे मुख्याध्यापक किशोर मानकर असून ते नित्यनेमाणे  ज्ञानार्जन करीत आहेत. ही शाळा १९५८ साली स्थापन झाली होती. या शाळेत शिकून काही विद्यार्थी नोकरीवर देखील लागले आहेत. जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे यासाठी गावातील पोलीस पाटील संदीप राजुरकर हे प्रयत्नशील आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 17:23 IST

संबंधित बातम्या