बुलढाणा: लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पार पडलेल्या अंतिम आढावा बैठकीतही भाजपने बुलढाणा मतदारसंघावर जोरकसपणे दावा केला आहे. भाजप लोकसभा प्रमुखांनी केलेल्या मागणीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ‘आवाजी समर्थन’ दिल्याने बैठकीचे चित्रच बदलले!

बुलढाणा जिल्ह्याच्या घाटावरील बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा, लोणार, सिंदखेडराजा, चिखली तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लोकसभा आढावा बैठक मेहकर येथे पार पडली. यावेळी आमदार श्वेता महाले पाटील, भाजप बुलढाणा लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे , जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, लोकसभा समन्वयक मोहन शर्मा, विस्तारक संतोष देशमुख, मेहकर विधानसभा प्रमुख प्रकाश गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. सहा तालुक्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – भाजपला उमेदवार मिळत नसल्याने पक्ष फोडतात – जितेंद्र आव्हाड

हेही वाचा – मोदींनी जुमल्याचे नावच ‘मोदी की गॅरंटी’ केले, यवतमाळात उद्धव ठाकरे बरसले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजयराज शिंदे म्हणाले की, बुलढाणा लोकसभेची जागा भाजपला देण्याची मागणी पक्षाकडे कार्यकर्त्यांच्या वतीने लावून धरली आहे. जेव्हाही बैठक होते, नियोजन सांगितले जाते, तेव्हा कार्यकर्ते, ‘पण हे सर्व कोणासाठी करायचे?’ असा प्रश्न विचारतात. त्यांनी असे म्हणताच कार्यकर्त्यांनी हो असे सांगितले. आमदार महाले यांनीही पक्षश्रेष्ठींकडे कार्यकर्त्यांची ही मागणी रेटून धरावी, अशी विनंती केली. समारोपात त्यांनी, ‘बुलढाणा लोकसभेची जागा’ असे म्हणताच सर्व कार्यकर्त्यांनी, ‘भाजपला मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा दिल्या.