यवतमाळ: पूर्वाश्रमीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व त्यानंतर विविध पक्ष फिरून भाजपात स्थिरावलेले व आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सहभागी होत असलेले माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची भाजपातून दोन वर्षांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> वाशीम: परिवहन विभागाकडून ५९ खासगी बसेसवर कारवाई, केवळ १० टक्के अधिक भाडे आकारण्यास मुभा

देशमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जात असल्याने भाजपला खिंडार पडणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भुतडा यांनी हे स्पष्टीकरण दिले. पक्षविरोधी कारवाया केल्याने भाजपने २०१९ मध्येच देशमुख यांची हकालपट्टी केल्याचे भुतडा यांनी सांगितले. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देशमुख यांच्यावर ही कारवाई केली होती. देशमुख कोणत्याही पक्षात गेले तर भाजपला काहीही फरक पडत नाही, अशी पुष्टीही भुतडा यांनी जोडली. मागील दोन वर्षात देशमुख भाजपच्या कुठल्याही व्यासपीठावर, अथवा संघटनात्मक कामात नव्हते. त्यामुळे त्यांचा आणि भाजपचा संबंध लावणे संयुक्तिक नसल्याचेही भुतडा यांनी सांगितले.

हेही वाचा >>> चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार, तीन दिवसात तिघांचा बळी

आज शिवबंधन बांधणार

दिग्रस येथील माजी राज्यमंत्री संजय देशमुख हे गुरुवारी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पुन्हा शिवसैनिक होणार आहेत. दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड हे शिंदे गटात गेले व मंत्री झाले. त्यामुळे दिग्रस मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे संजय राठोड यांना लढत देऊ शकणारा नेता नव्हता. मात्र आता देशमुख हे उद्धव ठाकरेंसोबत जाणार असल्याने दिग्रस मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex minister state sanjay deshmukh expulsion from bjp two years ago bjp district president nitin bhutda ysh
First published on: 19-10-2022 at 19:00 IST