scorecardresearch

Premium

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

आरोग्य विभागअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

Health Department recruitment
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : आरोग्य विभागअंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे.

अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्टपासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

kotwal bharti applications
Kotwal Recruitment: कोतवाल पदासाठी उच्चशिक्षितही रांगेत!; १५७ जागांसाठी खोऱ्याने अर्ज…
preparations for ganesh immersion in chandrapur
चंद्रपूर : श्रीगणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ईरई धरणातून अतिरिक्त पाणी
moratorium on tourism development schemes has been lifted
अलिबाग: पर्यटन विकास योजनांवरील स्थगिती उठवली, जिल्ह्यातील पावणे दोनशे कोटींची कामे मार्गी लागणार
vegetable-garden
गोंदिया: शालेय पोषण आहारात आता सात्विक अन्नाचा समावेश; जि. प. शाळांमध्ये साकारणार परसबागा

हेही वाचा – भारतात गोसेवा व गोरक्षण समजून सांगावे लागत आहे, हेच वेदनादायी; संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची खंत

हेही वाचा – ऋषिपंचमीनिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; साडेचारशे दिंड्या दाखल

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधीपण २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Extension of time to apply for health department recruitment applications can be made till this date dag 87 ssb

First published on: 20-09-2023 at 15:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×