महाकालीनगरातील घटनेने विषय ऐरणीवर

नागपूर : बेलतरोडी भागातील महाकाली नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीनंतर अशाच प्रकारे शहराच्या विविध भागात वसलेल्या झोपडपट्टय़ांच्या व त्यालगत असलेल्या नागरी वस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोकळय़ा जागांवर अतिक्रमण करून झोपडपट्टय़ा उभारल्या जात आहेत, मात्र त्याकडे महापालिका किंवा संबंधित तत्सम प्राधिकरणांकडून दुर्लक्ष केले जाते. यामुळे कालांतराने अनेक प्रश्न निर्माण होतात.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

गेल्या काही वर्षांत रोजगाराच्या शोधात बाहेरून आलेल्यांनी मिळेल त्या ठिकाणी झोपडय़ा उभारणे सुरू केले. शहरात अनधिकृत झोपडय़ा रोखण्याचे काम महापालिकेचे आहे. मात्र अनेकदा राजकीय वरदहस्तामुळे कारवाई केली जात नाही. उलट आवश्यक सुविधाही पुरवल्या जाते. त्यामुळे झोपडपट्टय़ांची संख्या वाढतच चालली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २५ वर्षांत नाल्याच्या काठावर किंवा रेल्वे रुळाला लागून ४० पेक्षा अधिक अनधिकृत झोपडपट्टय़ा वसलेल्या आहेत. यापैकी काहींवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे तर काही भागातील झोपडपट्टय़ा तेथे आगीची घटना घडल्यावर रिकाम्या झाल्या. बेलतरोडीतील महाकाली नगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या आगीदरम्यान पन्नासहून अधिक एलपीजी सििलडरचा स्फोट झाला. शहराच्या मध्यवस्तीत अशी घटना घडली असती तर अनेकांना त्याची झळ पोहचली असती. झोपडपट्टीत  आग विझवण्यासाठी बंब जाण्यासाठी रस्तेही नव्हते, त्यामुळे आग विझवताना अडचणी आल्या होत्या. आगीची झळ आजूबाजूच्या वस्त्यांना पोहचू नये म्हणून काळजी घ्यायची असते. मात्र अनधिकृत झोपडपट्टय़ांमध्ये अग्निसुरक्षेच्या संदर्भात काहीच उपाययोजना नसल्याने अनेक अडचणींना अग्निशमक विभागाच्या कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते.

वर्धा मार्गावरील चिंचभुवन रेल्वे पुलाखाली रेल्वे रुळाला लागून झोपडपट्टी वसलेली आहे. रस्त्याला लागून घरे आहेत. अनेकांनी तेथे पक्की घरेही बांधली. आजूबाजूला अनेक निवासी संकुल आहेत. या झोपडपट्टीत आगीची घटना घडली तर आजूबाजूंच्या वस्त्यांनाही धोका संभवतो.

शहरातील झोपडपट्टया

काचीपुरा, पांढराबोडी, मार्टीननगर, बौद्धनगर, पुनापूर, भांडेवाडी, सूर्यनगर, नोगा कंपनी, मानकापूर, मोतीबाग, भुतेश्वरनगर, संजय नगर, पंचशील नगर, भोसलेनगर झोपडपट्टी, वसंतराव नाईक झोपडपट्टी धरमपेठ, गुलशननगर, संतोषनगर, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसेनगर झोपडपट्टी, शांतीनगर, ताजनगर, शिवाजीनगर झोपडपट्टी, गरीब नवाजनगर झोपडपट्टी, यशोधरा नगर, राणी दुगार्वतीनगर, आझादनगर, मेडिकल चौक, इंदिरा नगर, संजय नगर टिमकी.

झोपडपट्टींना लागलेल्या आगी

सक्करदरा झोपडपट्टी – १९९९

मार्टीननगर झोपडपट्टी – २००४

कळमना झोपडपट्टी- २००६

झोपडपट्टीमध्ये राहणारे बहुतांश मोलमजुरी करणारे आहेत. झोपडीसाठी ते टीना, लाकूड, कापडाचा उपयोग करतात. पूर्वी हे लोक चुलीवर स्वयंपाक करायचे, आता बहुतांश लोकांकडे सििलडर आहे. एका झोपडीला लागलेली आग वेगाने पसरते. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे कुठलीही व्यवस्था नसते.

राजेंद्र उचके, अग्निशमन अधिकारी, महापालिका.