बुलढाणा: जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्य शेतकरी व मत्स्यसंवर्धक यांना आवर्ती खर्च भागविण्याकरीता किसान क्रेडीट कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात विशेष अभियान राबविण्यात येत असून आजअखेर ४७२ अर्ज प्राप्त झाले आहे.
मत्स्य व्यवसायचे सहायक आयुक्त सु.ग. गावडे यांनी यांनी ही माहिती दिली. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत घर-घर किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविण्यात येत आहे. मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी शिबीर घेवून कार्ड तयार करुन देण्यात येत आहे. आजपर्यंत ८ ठिकाणी शिबीर घेण्यात आले. तसेच शासन आपल्या दारी व देऊळगाव राजा येथील कृषी प्रदर्शनमध्ये विशेष शिबीर लावण्यात आले. यावेळी ४७२ मच्छिमारांचे अर्ज प्राप्त झाले.मच्छिमार, मत्स्य शेतकरी व मत्स्यसवंर्धक यांना योजनेंतर्गत ६० हजार ते १ लक्ष ५० हजार रुपये आवर्ती खर्च भागविण्याकरीता अर्ज करता येईल.