चंद्रपूर : प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतरच स्पष्ट होईल. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलीस भरती घेतली. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे २०० पोलीस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणासाठी आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात राहत असून याच परिसरातील ‘कॅन्टिन’मध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण करतात. रविवारी सुमारे ४० प्रशिक्षणार्थ्यांनी येथे जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक

पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून जेवणाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. ‘डी-हायड्रेशन’मुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच समोर येईल.