‘महाराष्ट्र म्हणजे केक वाटलाय का? की त्याचे हवे तितके तुकडे करायचे?’ असा जाहीर सवाल करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांना स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी त्यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्राच्या प्रतिकृतीचा केक तयार करून त्यातून विदर्भ आणि मराठवाडय़ाचा हिस्सा वेगळा करून चोख प्रत्युत्तर दिले.
अ‍ॅड. श्रीहरी अणे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांचा जन्मदिवस होता, मंगळवारी रविभवनात मध्यरात्रीनंतर एका कौटुंबिक सोहळ्यात तो साजरा करण्यात आला. यावेळी त्यांचे वकील मित्र, व्ही-कनेक्ट या संघटनेचे पदाधिकारी आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात अणे यांनी कापलेल्या केक मुळे हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला आहे. केकची प्रतिकृती महाराष्ट्राच्या आकाराची होती, त्यावर मराठवाडा आणि विदर्भ असे वेगवेगळे भाग दर्शविण्यात आले होते. अणे यांनी या केकमधून विदर्भ आणि मराठवाडा हे दोन भाग वेगळे करून आपला जन्म दिवस साजरा केला. मुंबई येथील सभेत राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध करताना महाराष्ट्र म्हणजे केक वाटला काय? की ज्याचे हवे तितके तुकडे करावे? असा सवाल करीत महाराष्ट्राचे चार तुकडे करा, अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत मा.गो वैद्य यांच्यावर टीका केली होती. या टीकेला अ‍ॅड. अणे यांनी केक कापूनच प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former ag shreehari aney celebrates birthday by cutting vidharbha from maharashtra on his cake
First published on: 14-04-2016 at 02:34 IST