पाच ते सहा नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.शहरातील न्यू तापडिया नगर भागात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास १४ व १६ वर्षीय दोन मुलींवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला. या नराधमांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची माहिती आहे. या अमानुष प्रकारामुळे शहर चांगलेच हादरले. पीडित मुलींनी घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगताच त्यांना धक्का बसला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी मुलींच्या पालकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा >>>ह्रदयद्रावक! दोन दिवसावर साखरपुडा अन् भावाच्या डोळ्यादेखत बहिणीला ट्रकने चिरडले

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

पोलीस पथक संशयाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असून काहींना ताब्यात घेतल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना देखील गुन्हेगारीचा चढता आलेख आहे.